Wednesday 19 august 2009
3
19
/08
/Aug
/2009
14:32
कलियुगापूर्विची कमलपत्रावरील कथा!
दाट दाट, अगदी घनदाट अरण्य होते ते! दंडकारण्य! दिवसाही अंधार दाटावा अशी किर्र झाडी! शतकानुशतकांच्या धो धो पावसात ते घोर अरण्य स्वैर फोफावले होते. शेंडे आभाळाला भिडले होते. पाळेमुळे पाताळात पोचली होती. दंडकारण्य! नुसते नाव ऐकले तरी अंगावर काटा उभा रहावा. महाभयंकर! भयप्रद!